ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महानगरपालिकेचे वर्दळीच्या रस्त्यांवर वॉकिंग प्लाझाचे नियोजन

पुणे, दि. ८ - पुणे शहरातील महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठी वर्दळ असलेल्या  रस्त्यावरवॉकिंग प्लाझासंकल्पना राबवण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. पादचाऱ्यांना पदपथाचा (फूटपाथ) चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी लक्ष्मी रस्त्यावरवॉकिंग प्लाझाचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.

लक्ष्मी रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही या रस्त्याला महत्त्व आहे. या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी, तसेच वाहनांची वर्दळ, पदपथांवर झालेले अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना विनाअडथळा प्रवास करणे अशक्य होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर वॉकिंग प्लाझा ही संकल्पना राबविण्याचा विचार पुढे आला आहे.

सुरुवातीच्या काळात लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम) ते उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक) या चारशे मीटर अंतरात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी सल्लागार म्हणून अहमदाबाद येथील एचपीसी डिझाइनची नियुक्ती करण्यात आली आहे. वॉकिंग प्लाझा करायचा झाल्यास लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते शगुन चौकादरम्यान वाहनांवर बंदी घालावी लागणार आहे. तसेच, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरून येणारी वाहने केळकर रस्त्यावरून वर्तुळाकार मार्गाने पुन्हा लक्ष्मी रस्त्यावर आणावी लागतील, असे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.