ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ८ व ९ ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्त

पुणे, दि. ८ - मुंबईतील उद्याच्या मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे जाण्याची शक्यता आहे. पुण्यासह आजुबाजूच्या जिल्ह्यातून मुंबईकडे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणारी वाहने कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई या द्रुतगती मार्गानेच जातील. या महामार्गावर नेहमीच सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ असतेच. यामध्येच मराठा मोर्चासाठी जाणारी वाहने आल्यास वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊन महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून कामाच्या निमित्ताने जाणा-या नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ऑगस्ट रोजी पोलीस विभागातर्फे आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि इतर आवश्यक व्यवस्थाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणा-या नागरिकांना सुलभतेने मुंबईला पोहोचता यावे यासाठी रोज प्रवास करणा-या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून द्रुतगती महामार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.