ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जलयुक्त शिवार योजनेने देशाला आदर्श दिला - मुख्यमंत्री फडणवीस

पुणे, दि. ८ - जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनता उत्साहाने काम करीत आहे. या उत्साहाला संस्थात्मक रूप देऊन राज्य दुष्काळमुक्त करू. नद्या पुनरूज्जिवीत कराव्यात आणि गावे स्वावलंबी करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. जलसाक्षरता केंद्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला आयडियल मॉडेल दिले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचा जलसंपदा विभाग आणि यशदाच्या संयुक्तपणे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळा, जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलबिरादरी चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, चंद्रकांत दळवी, पोपटराव पवार उपस्थित होते.

जलसाक्षरता केंद्राच्या उद्घाटना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच खो-यातील नद्यांचे आणलेले पाणी एका जलकुंभात एकत्र करण्यात आले. हा जलकुंभ मुख्यमंत्री यांनी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्याकडे सुपूर्त केला. मंगळवार पासून सुरु झालेल्या नमामि चंद्रभागा जल साक्षरता यात्रे मध्ये ते हा जलकुंभ घेऊन फिरणार आहेत.

यशदामधील जलसाक्षरता केंद्राची आणखी उपकेंद्रे नागपूर, अमरावती, औरंगाबाद येथे उभारण्यात येणार आहेत. यासाठी २८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यशदाचे महासंचालक आनंद लिमये, डॉ. सुमंत पांडे यांच्याकडे या जलसाक्षरता केंद्राची जबाबदारी आहे. ७५७५ जलसेवक (ग्रामपंचायत स्तर), ३५१० जलदूत (तालुका स्तर), ३४० जलप्रेमी (जिल्हा स्तर), ४८ जलयोद्धा (विभाग स्तर), २४ जलनायक (शासकीय अधिकारी-कर्मचारी) प्रशिक्षित करण्याचे उद्दीेष्ट या जलसाक्षरता केंद्रासमोर आहे.

या प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून राज्यात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी राहण्यास मदत होणार आहे. या जलकार्यकर्त्यांकडून २५ हजार गावे दुष्काळमुक्त करणार आहोत. पाण्याचा वापर योग्य होतो का, पीके योग्य प्रकारची लावली जातात का, याची काळजी देखील हे प्रशिक्षत कायकर्ते घेतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. राजेंद्रसिंह यांनी Posted On: 08 August 2017