ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

धूरफवारणी यंत्राच्या खरेदीसाठी ७१ लाख खर्चाला महापालिकेची मंजुरी

पुणे, दि. ९ - पावसाळ्यामुळे शहरात पसरलेल्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात येणाऱ्या धुरफवारणीच्या फॉगिंग मशीनची खरेदी आणि त्यासाठी वाहन भाडेतत्वावर घेण्यासाठी ७१ लाख ६० हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहरात डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता कीटक प्रतिबंधक विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी धुरफवारणी केली जाते. पालिकेच्या किटक विभागाने धुर फवारणीच्या मशीन दहा वर्षापुर्वी खरेदी केलेल्या आहेत. या सातत्याने नादुरुस्त होत आहे. अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद नसल्याने ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या सेवकांच्या वेतनासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून वर्गीकरण करून हे पैसे घेण्यात आले आहेत.

यामध्ये कोल्ड थर्मल फॉगिंगसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये, टेम्पो भाडेतत्वावर घेण्यासाठी २१ लाख ६० हजार रुपये असा एकूण ७१ लाख ६० हजारांचा खर्च प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.