ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सोलापूरचा मुलगा ब्लू व्हेलच्या नादात थेट पुण्याला पोहचला

पुणे, दि. १० - सध्याच्या घडीला ब्लू व्हेल गेमचे भयाण वास्तव वाढत जात असून, पुण्यातही आता अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या एका मुलाला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मुलाला पालकांच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले.

टास्क पूर्ण करण्याच्या निमित्ताने सोलापुरातील १४ वर्षीय मुलगा पुण्याच्या गाडीत बसून रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी मग भिगवण पोलिसांशी संपर्क साधून त्या मुलाला वाटेतच उतरवल्यामुळे आतापर्यंत शहरात पसरलेले हे ब्लू व्हेल गेमचे जाळे आता गावखेड्यातही पोहचले आहे. मुलाला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला, तरी ब्लू व्हेल गेमचे जीवघेणे रुप पुन्हा एकदा समोर आले आहे.