ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचा वैद्यकीय खर्च तब्बल ३५ लाख

पुणे, दि. १० - महापालिकेच्या आजी माजी नगरसेवकांचा वैद्यकीय खर्च  महापालिकेच्या तिजोरीतून केला जातो. गेल्या पाच महिन्यांमध्ये नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारापोटी तब्बल ३५ लाख रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झालेला आहे.

पुणे महापालिकेकडून माजी सदस्य त्याच्या पत्नी अथवा पतीस, तर विद्यमान सदस्य असल्यास त्या सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च केला जातो. त्यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने २०१४-१५ मध्ये ठराव करून नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय योजनेस मान्यता दिली होती.

या योजनेनुसार, नगरसेवकांनी एखाद्या रुग्णालयामध्ये दाखल होत असताना महापालिकेल अगोदर कळवणे आवश्यक असते. यानंतर पालिका प्रशासन रुग्णालयाला पत्र देऊन बिलाची हमी घेते. काही वेळा उपचार पार पडल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांच्या नावे बिले अदा करण्यात येतात. गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल ६० नगरसेवकांनी या योजनेचा फायदा घेतला असून २८ नगरसेवकांनी उपचारानंतर बिले सादर केली आहेत. तर ३२ नगरसेवकांची बिले रुग्णालयांच्या नावावर देण्यात आली आहेत. त्यासाठी आतापर्यंत ३४ लाख ७६ हजार रुपये खर्च झाले आहेत.