ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून महिला डॉक्टरची आत्महत्या

पुणे, दि. १० - पुण्यातील सुखसागरनगर परिसरात एक महिला डॉक्टरने आजारपणाला कंटाळून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज (गुरुवार) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून आजारणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

 डॉ. इंदू शाम डोंगरे (रा. साईनगर, सुखसागरनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास कोंढवा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले

 याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन हॉस्पिटल आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत होत्या. या उपचारांना कंटाळूनच त्यांनी आज (गुरूवारी) सायंकाळी गजानन रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.