ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

महापालिकेच्या प्रभागातील चारही नगरसेवकांची सहमती आवश्यक

पुणे, दि. १६ - शहरातील विविध विभागात रस्ते, चौक, उड्डाणपूल, वाहनतळे, भुयारी मार्ग अशी विकासकामे पुणे महापालिकेच्या वतीने केली जातात. या विकासकामांचे नामकरण करण्यासाठी प्रभागातील चार अथवा तीन नगरसेवकांची सहमती असणे आवश्यक ठरणार आहे. यासंदर्भात नगरसेवकांचे एकमत झाल्यास विकासकामाला नाव सुचविण्याचा अधिकार महापौरांना देण्यात आला आहे. महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकासकामे करण्यात येतात. या विकासकामांना नाव देण्यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांकडून नाव समितीकडे प्रस्ताव देण्यात येत असे. त्यावर प्रशासनाचा अभिप्राय घेतल्यानंतर नाव समिती निर्णय घेत असे. यंदा महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने पार पडल्या आहेत. विकासकामांना नाव देताना प्रभागातील चारही नगरसेवकांचे मत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाला नाव द्यायचे झाल्यास चार अथवा कमीत कमी तीन नगरसेवकांचे एकमत असणे आवश्यक आहे, अन्यथा महापौर आपल्या अधिकारात नाव सुचविणार आहेत. यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यात आले आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांना काही नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांची नावे दिली होती. त्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कान उपटले होते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने नाव समितीचे धोरण तयार करण्यात आले. या समितीकडून विकासकामांना कोणते नाव द्यायचे याचा प्रस्ताव सादर करण्यात येतो.