ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गोरखपुर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत - खासदार चव्हाण

पुणे, दि. १६ - उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील सरकारी रुग्णालयात झालेल्या ७० हुन अधिक बालकांच्या मृत्यूची घटना देशाच्या आरोग्याला धक्का देणारी आहे. भारतासारख्या विकसनशील देशात असे घडावे ही खेदजनक बाब आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनी स्वीकारावी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.

ऑक्सीजन अभावी इतक्या मोठया संख्येने बालकांचा मृत्यू होणे धक्कादायक आहे. बाबा राघवदास सरकारी रूग्णालयाला ज्या कंत्राटदाराकडून ऑक्सिजन सिलींडरचा पुरवठा केला जात होता त्या कंत्राटदाराचे आधीचे बिल अदा केल्याने त्याने ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा थांबवला. त्यातून बालके दगावली. या घटनेने रुग्णालय प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभार याचे दर्शन करून दिले आहे.

या प्रकरणाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा दिला पाहिजे. या मृत्यु कांडानंतर ज्या असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्या गेल्या, त्यामुळे सत्ताधारी पक्षाची असंवेदनशीलता प्रकट झाली आहे. त्यांचाही या निमित्ताने निषेध करावा, तितका थोडाच आहे, असेही खासदार चव्हाण म्हणाल्या.