ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तरुणाच्या धाडसामुळे मुठा नदीत उडी मारलेल्या तरुणीचे वाचले प्राण

पुणे, दि. १६ - एस.एम. जोशी पुलावरून एका विद्यार्थीनीने मुठा नदीत उडी मारल्याचे पाहताच एका तरुणाने क्षणाचाही विलंब करता तिच्या पाठोपाठ लगेच उडी मारून तरुणीला वाचवले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. समीर शेख (वय १८) असे या तरुणीला वाचवणा-या तरुणाचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची पनवेलची असून पुण्यात शिक्षणासाठी आलेली आहे. पुण्यात ती पेइंगेस्ट म्हणून राहते. डेक्कन परिसरातील महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकते. तरुणीच्या मैत्रिणी अभ्यासात हुशार असून त्यांच्या एवढा अभ्यास होत नसल्यामुळे ती नैराश्यात आली होती. त्यातून ती सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एस. एम. जोशी पुलावर आली. तिने पुलावरून नदीमध्ये उडी घेतली.

त्यावेळी समीर हा तरुण दुचाकीवरून पुलावरून जात होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि त्याने ही तत्काळ तिच्या मागे पुलावरून नदीत उडी घेऊन तिला वाचविले. मुलीने नदीत उडी मारल्याचे पाहिल्यानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती. तसेच, अनेकांनी नदीपात्रात जाऊन दोघांना बाहेर काढले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.