ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खांदेपालट करण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात

पुणे, दि. १८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त केली होती. परंतु सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे पाहता राज ठाकरे आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) शहरात स्वतः थांबून महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. 

पुणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेची वाताहत झाली. २०१२ च्या निवडणुकीत मनसेने २७ जागा जिंकून नाशिक नंतर पुण्यात मोठे यश संपादन केले होते. मात्र पुणेकरांच्या प्रश्नांवर नेहमीच तटस्थ भूमिका घेतल्याने मनसेला पुणेकरांचा विश्वास टिकवता आला नाही. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

महानगरपालिका निवडणूकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाताहत झाल्यानंतर तळापासून पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी राज ठाकरे हे स्वत: संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी आज राज ठाकरे पुण्यात आले असून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती स्वत: ठाकरे घेणार आहेत. शहरातील पक्षाच्या नव्याने होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महापालिकेच्या प्रभागनिहाय करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक सदस्यांची मुलाखत घेऊन स्वत: ठाकरे या संदर्भातील नियुक्त्या करणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले आहे. सदरची बैठक शिवाजीनगर येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत होणार आहे.