ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डॉ. दाभोलकरांची हत्या संपत्तीच्या वादातून तर नाही ना झाली - सनातन

पुणे, दि. १८ज्येष्ठ विचारवंत प्रा. . प्र. प्रधान यांनी त्यांची वसुधा मनोविकास प्रतिष्ठान'ची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नावे केली आहे. प्रत्यक्षात ही सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखविली नाही. ही मालमत्ता गेली कुठे, ही मालमत्ता गिळंकृत करण्याच्या वादातून तर डॉ. दाभोळकरांची हत्या झाली नाही ना, असा प्रश्न सनातन संस्थेने आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते.

अभय वर्तक पुढे म्हणाले कीदाभोलकरांच्या हत्येच्या तपासावर दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर जवाब दो ची दवंडी पिटणारे अंनिसवाले त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोट्याळ्याविषयी गप्प का आहेत हा पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याशिवाय दाभोलकर हत्येतील पिस्तूल ज्या खंडेलवाल आणि नागोरी यांच्याकडे सापडले त्यांना शिक्षा व्हावी याकरीता अंनिस का प्रयत्न करताना दिसत नाही. दाभोळकरांचे खरे खूनी सापडावेत ही इच्छा आहे की, सनातनच्या साधकांना त्रास व्हावा हा हेतू आहे हेच कळत नाही. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्हीच अंनिसला 'जवाब दो' असे आवाहन करीत आहोत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये घोटाळे कोणी केलेप्रा. .. प्रधान यांनी अंनिसला दान केलेली मालमत्ता कुठे गायब झाली, नागोरी, खंडेलवाल यांच्या जामीनाला विरोध नाही, पण डॉ. तावडेंच्या जामीनाला विरोध का, आणि दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात खटला चालू नये, यासाठीच सगळे प्रयत्न का असे प्रश्न उपस्थित करत अंनिसने याची उत्तरे द्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.