ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अजब रिपोर्ट, पुरुषाला आहे गर्भाशय

पुणे, दि. १९ पोटदुखीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या सागर गायकवाड या तरुणाला गर्भाशय असल्याचा धक्कादायक अहवाल प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नुकताच दिला आहे. चक्रावलेल्या सागर गायकवाड यांनी थेट फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतल्यानंतर हा अहवाल चुकीचा असल्याचे उघड आले. या घडलेल्या अजब प्रकारामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला आहे.

पोटदुखीने त्रस्त असलेल्या सागर गायकवाड यांनी मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली. मात्र पोटदुखीचा त्रास जास्त असल्याने डॉक्टरांनी त्यांना दीनानाथ रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गायकवाड यांनी दीनानाथ रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी केली असता त्यांना चक्क गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने हातात दिला. या प्रकाराने चक्रावलेल्या गायकवाड यांनी दुस-या डॉक्टरांचा सल्ला घेणे पसंत केले. दुस-यांदा केलेल्या तपासणीत मात्र दीनानाथ रुग्णालयाने दिलेला अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

या सर्व प्रकारामुळे गायकवाड यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गायकवाड यांनी तब्बल दोन महिने तणावाखाली घालवले. झाला प्रकार त्यांनी मित्रमंडळींच्या कानावर घातला असता त्यांनाही हा सर्व प्रकार हास्यास्पद वाटला. हा अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मात्र गायकवाड यांचा जीव भांड्यात पडला.

याबाबत रुग्णालयाचे संपर्क अधिकारी येडकीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी चौकशी करून माहिती देणार असल्याचे सांगितले. हा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तो तितकाच गंभीर आहे. या सर्व प्रकारामुळे रुग्णालय कर्मचा-यांच्या छोट्या चुकीमुळे एखाद्याच्या आयुष्यात वादळ निर्माण निर्माण होऊ शकते. ही एक गंभीर घटना असून अशी चूक एखाद्याच्या जिवावरही बेतू शकते, त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांनी काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे.