ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… म्हणून काय टिळकांचे योगदान विसरता येणार नाही - राज ठाकरे

पुणे, दि. १९ टिळक - रंगारी वाद म्हणजे मूर्खपणा आहे. यामुळे लोकमान्य टिळकांचे योगदान विसरता येणार नाही असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. भाऊ रंगारी गणेश मंडळाच्या विश्वस्तांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक नसून भाऊ रंगारी आहेत असा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

पुणे महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात ते पुण्यात दाखल झाले असून त्यासाठी प्रत्येक सदस्यांची मुलाखत घेऊन स्वत: ठाकरे या संदर्भातील नियुक्त्या करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात मनसेचा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यावेळी पक्षाची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी सविस्तरपणे चर्चा करेन असे ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त केली होती. परंतु सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे पाहता राज ठाकरे आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) शहरात स्वतः थांबून महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत.