ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पत्रकार बोलायला घाबरले मात्र दाभोळकर घाबरले नव्हते - राजदीप सरदेसाई

पुणे, दि. २१ - आज काल मोठमोठे चॅनल आणि त्यांचे पत्रकार धर्मावर बोलायला घाबरतात पण नरेंद्र दाभोळकर कधी घाबरले नाही. आजची पत्रकारिता पैशाच्या ताकदीला बळी पडत आहे. मात्र, दाभोळकर कशाच्या पुढे झुकले नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (दि.२०) चार वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना शिक्षा झालेली नाही. तसेच सर्व तपास अत्यंत संथ गतीने होत आहे. याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येत आहे. निषेध रॅलीनंतर आयोजित हिंसा के खिलाफ मानवता की और उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी बोलताना सरदेसाई पुढे म्हणाले की, श्री श्री रवी शंकर, आणि बाबा रामदेव यांच्या वर आजकल कोणी बोलायला तयार नाही, कोणताही पत्रकार कोणताही चॅनल त्यांच्यावर बोलत नाही. कारण त्यांच्याकडे पैशाची ताकद आहे. तसेच राजनैतिक पाठबळ देखील या लोकांना लाभत आहे. पतंजली हा सर्वात मोठा जाहिरातदार आहे. त्यामुळे कोणताही मीडिया त्यांच्यावर लिहिण्यास दाखवण्यास घाबरत आहे. पत्रकारिता हा टीआरपीचा व्यवसाय झाला आहे.

ज्या बातम्यांना टीआरपी आहे तीच दाखवली जाते. देश हिताशी कोणाला देणे घेणे नाही. मीडिया एक तमाशा झाला आहे. रोज रात्री मोठमोठ्या चैनलवर १० लोकांना बोलवून चर्चासत्राच्या नावाखाली तमाशा दाखवला जातो. पहिले हे हिंदीमध्ये होते आता मराठीतही सुरू झाले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.