ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जुन्नरजवळ गाडीने पेट घेतल्याने आगीत होरपळून तिघांचा मृत्यू

पुणे, दि. २३ नगर-कल्याण महामार्गावर रस्त्यात स्विफ्ट डिझायर कारने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत होरपळून गाडीतील तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावाजवळील सातकर मळा येथे रात्री दीडच्या सुमारास घडली. बंटी चासकर, नरेश वाघ, दिलीप नवले, अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कारमधून तिघे जात असताना वडगाव आनंद गावाजवळील सातकर मळा येथून जात असताना रस्त्याच्या कडेला धडकून गाडीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. यात अडकलेल्या तिघांचाही आग विझवेपर्यंत होरपळून मृत्यू झाला.