ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या तोंडात बारामतीची पोतंभर साखर

पुणे, दि. २३ - हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा खोचक चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आता पवार शब्द पाळणार का याची उत्सुकता शिगेला पोचली होती. अखेर आज पवारांनी साखरेचं एक पोतं पाठवून आपला शब्द पाळला आहे. मात्र ही साखर हवामान खात्यांच्या अधिकाऱ्यांना किती गोड लागणार हे मात्र पाहावे लागेल.

जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हवामान खात्याच्या अंदाज पंचे कारभारावर टीका केली होती. हवामान खात्याने १९ ऑगस्टला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. हल्ली या अंदाजांवर शेतकरी विश्वास ठेवेनासे झालेले आहेत. मात्र, आश्चर्यकारकरित्या यंदाचा अंदाज बरोबर ठरला.

यावेळचा अंदाज खरा ठरल्यास मी या तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन अशी खोचक टीका पवार यांनी केली होती. त्यामुळे आता शरद पवार आपलातोशब्द खरा करणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पण आज अखेर शरद पवार यांनी हवामान खात्याला बारामतीची साखर पाठवली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हवामान विभागाला बारामतीची साखर भरवणार आहेत.