ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ॠषिपंचमीनिमित्त हजारो महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण

पुणे, दि. २६ - ओम् नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नम:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३१ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशभूषेत पहाटे चार वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे

यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरिता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३१ वे वर्ष होते
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, महिलांशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. स्वातंत्र्याकरिता देखील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महिलांमध्ये असणारी शक्ती आपण ओळखलेली नाही, त्यामुळे महिलांना देखील समान अधिकार मिळायला हवे. चांगले जीवन जगण्यासाठी भक्ती, शक्ती, सदभाव, प्रेम आणि शांती गरजेचे आहे, त्यामुळेच समाज सुसंस्कृत होतो. स्त्री च्या सद््भावना घरातच राहण्यापेक्षा समाजात याव्या, तरच समाजात शांती निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले
अशोक गोडसे म्हणाले, तब्बल ३१ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, या करिता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज ३१ हजार महिला सहभागी झाल्या आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले.