ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एसटी-टेम्पोचा भीषण अपघातात ९ ठार, ९ जण गंभीर जखमी

नारायणगाव, दि. २८ - पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ एसटी टेम्पोचा भीषण अपघात होऊन जणांचा मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज रात्री (दि. २८) दीड वाजण्याच्या सुमारास झाला. दरम्यान जखमी मयतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले

अपघातात शोभा पगार (वय ५५), यमुना पगार (वय ४५), विकास गुजराती (वय ३०), सागर चौधरी (वय ४५), संकेत मिस्त्री (वय ३५), किशोर धोंडरे आणि रशीद पठाण, अभिकेत जोशी (वय २३) अशी यात मयत झालेल्याची नावे आहेत. तर एका वयस्कर महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच जखमींना घटनास्थळापासून वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अद्याप त्यांची नावे समजावयाची आहेत

ञ्यंबकेश्वर (नाशिक) - पुणे (एम.एच. १४ बी.टी.४३५१) ही एस.टी. बस ञ्यंबकेश्वर नाशिकवरून काल रात्री (दि. २७) नऊ वाजता निघाली होती. आज रात्री दीडच्या सुमारास ही बस नारायणगाव जवळ पुणे-नाशिक महामार्गावरील एक टेम्पो रस्त्यात टायर बदलण्यासाठी उभा असताना पाठीमागून भरधाव धडकल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये नऊ जण मृत्यूमुखी पडले असून सात जण गंभीर जखमी आहे. या बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते.

जखमींना आळेफाटा जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मयतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या एसटी बसने कोणाचे नातेवाईक प्रवास करीत असल्यास त्यांनी ०२१३२-२४२०३३ - नारायणगाव पोलीस ठाणे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक . एल. गोरड ९६२३९३६१००, पोलीस उप-निरीक्षक  व्ही. . वाघमारे ९१३०३८२०४५ यांना संपर्क साधावा.