ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

परदेशात गेल्यावर एकतरी विद्वान हमखास भेटतो – नितीन गडकरी

पुणे, दि. २९ - देशाला सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्याने नेतृत्व दिले असून देशात पुण्याचा नावलौकीक स्वातंत्र्यापासून आजतागायत आहे. खरे म्हणायचे तर विद्वान लोकांची पुणे ही खाण असल्याचे मत केंद्रीय वाहतूक भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीनिवास पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संचेती यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी इच्छा श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.

त्रिदल संस्थेतर्फे पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. डॉ. संचेती हे त्यांचे काम उत्तम प्रकारे करत आहेत. त्यांच्या कामामुळे देशातील सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पुणेकर नागरिकांनी दिलेला पुरस्कार महत्त्वाचा आहे. खर्या अर्थाने आज ते गरिबांचा आधारवड आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.

डॉ. संचेती यांच्याबरोबर असलेले ऋणानुबंध पालकमंत्री बापट यांनी व्यक्त केले. यावेळी बालगंधर्व सभागृह हास्यकल्लोळात न्हावून निघाले. महापौर मुक्ता टिळक यांनी आतंकवाद चले जावचा नारा दिला. पुणेकरांनी दिलेला पुण्यभूषण पुरस्कार हाच भारतरत्न असल्याचे डॉ. संचेती यांनी यावेळी सांगितले. काम करताना ज्ञान आणि सेवा यांची आवश्यकता असते. तरच चांगले काम होते. माझ्या आयुष्यात सतत चांगली माणसे भेटली. घरचे आणि मित्रमंडळीचे माझ्यावर संस्कार झाले आहेत. आज त्या संस्काराचे चीज झाले असल्यासारखे वाटले असे मत डॉ. संचेती यांनी पुरस्काराला उत्तर देताना मांडले.