ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्याला पाणीपुरवठा करणा-या चारही धरणात ९२.८७ टक्के पाणीसाठा

पुणे, दि. ३० - पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या चारही धरणात मिळून आज (दि. ३०) सकाळी सहा वाजेपर्यंत ९२.८७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, हा पाणीसाठा मागीलवर्षी पेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा ९८.४८ टक्के इतका होता.

मिळालेल्या वृत्तानुसार, काल (दि. २९) सकाळपासून ते आज सकाळी सहावाजेपर्यंत खडकवासला धरणात मिमी, पाणशेत धरण परिसरात २२ मिमी, वरसगाव धरण क्षेत्रात २४ मिमी तर टेमघर धरण क्षेत्रात सर्वात जास्त ५१ मिमी इतका पाऊस पडला आहे. आकडेवारीवरून साधारणपणे खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. तर धरणातून ५८९२ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.