ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्वारगेटच्या ट्रान्सपोर्ट हबचे काम सहा महिन्यात सुरू करा - मुख्यमंत्री

पुणे, दि. ३१ - स्वारगेट येथील जेधे चौकातील सुमारे चार एकर जागेमध्ये मेट्रोचे स्थानक साकारण्यात येणार आहे. त्यात एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या बसलाही सामावून घेण्यात येणार आहे. एसटी, पीएमपी आणि मेट्रो यांची सांगड घालून मेट्रो स्थानक म्हणजेच 'ट्रान्स्पोर्ट हब' (इंटिग्रेटेड मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब) उभारण्यात येणार असून त्याचे काम महामेट्रोने  सहा महिन्यात सुरू करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आढावा बैठकीत दिले.

महामेट्रोच्या वतीने नागपूर आणि पुण्यात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. शहरातील मेट्रो स्थानकासाठी शिवाजीनगरमधील धान्य गोदामाची जागा मिळविणे, तसेच कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या जागेपैकी काही भाग मिळविण्यासाठी महामेट्रो प्रयत्नशील असून जागांच्या संपादनाबाबतही त्यांनी काही सूचना दिल्या

जेधे चौकात सुमारे चार एकर जागेमध्ये मेट्रोचे स्थानक साकारण्यात येणार आहे. त्यात एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या बसलाही सामावून घेण्यात येणार आहे. एसटी, पीएमपी आणि मेट्रो यांची सांगड घालून मेट्रो स्थानक म्हणजेच 'ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्यात येणार आहे. याबाबत एसटी आणि पीएमपीबरोबर चर्चा सुरू असून लवकरच आराखडा तयार करण्यात येईल. जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यात सुरू करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली

जेधे चौकातील भूमिगत स्थानकासाठी एसटी, पीएमपी, महापालिका आदी संस्थांबरोबर महामेट्रोला काम करायचे आहे. त्यामुळे महामेट्रो समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. ट्रान्स्पोर्ट हबचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून त्यावर विचारविनिमय करून अंतिम आराखडा तयार झाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल, असे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.