ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सिटी लीडर अॅडव्हायजरी कमिटीत आयुक्त कुणाल कुमार

पुणे, दि. ३१ - रॉकफेलर फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्या १०० रेझिलियंट सिटीज उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवरील न्यू सिटी लीडर अॅडव्हायजरी कमिटीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार सहभागी झाले आहेत, तर पुण्यातील रेझिलियन्स कार्यालयावर मुख्य रेझिलियंट अधिकारी म्हणून (सीआरओ) भास्कर भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१०० रेझिलियंट सिटीजप्रकल्पात भारतातील पुणे, सूरत, चेन्नई या शहरांची निवड झाली आहे. त्याअंतर्गत शहराकरिता विस्तृत कम्युनिटी रेझिलियन्स स्ट्रॅटेजी तयार करण्यात येणार असून त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात रॉकफेलर फाऊंडेशन आणि पुणे महापालिकेत लवकरच करार होणार आहे, अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार, उपक्रमाचे व्यवस्थापक सौरभ गायधनी यांनी दिली. यावेळी भास्कर भट्टाचार्य उपस्थित होते

शहरांना भविष्याची आव्हाने पेलण्याबरोबरच अस्तित्व टिकवायचे असेल, बदल स्वीकारायचे असेल तर नागरी लवचिकता आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी १०० रेझिलियंट सिटीजहा उपक्रम महत्वाचा आहे. यासंदर्भात लवकरच स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.