ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महिलेला सर्वोच्च न्यायालयाकडून गर्भपात करण्याची परवानगी

पुणे, दि. १ - सर्वोच्च न्यायालयाने आज, पुण्यातील एका महिलेला गर्भपाताची परवानगी दिली. गेल्या २४ आठवड्यांपासून संबंधित महिलेच्या पोटात गर्भ वाढत आहे. पण, त्या गर्भाला कवटी आणि मेंदूच नसल्याने गर्भला जन्म देण्याविषयी पेच निर्माण झाला होता. त्यामुळे संबंधित महिलेने न्यायालयात याचिका दखल केली होती.

गर्भधारणा झालेल्या महिलेचे वय २० वर्षे असून, तिची पुण्यातील हॉस्पिटलमध्येच तपासणी करण्यात आली होती. अशा प्रकारच्या मुलाला जन्म दिल्यास त्याची जगण्याची क्षमता फारच कमी असल्याने अर्भपाताची परवानगी  द्यावी, अशी याचिका संबंधित महिलेने न्यायालायत दाखल केली होती.

असे मूल जन्मल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नसल्याचे पुण्यातील बी. जी. मेडिकल कॉलेज या सरकारी दवाखान्याने म्हटले आहे. मेडिकल कॉलेजचा हा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ग्राह्य मानला आणि गर्भपात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय दिला आहे.  न्यायाधीश एस. . बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांनी हा निर्णय दिला.