ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नामकरणासाठी पुणे महापालिकेच्या नाव समितीकडे ३० प्रस्ताव

पुणे, दि. १ - शहरातील विविध विकासकामांना नाव देण्यासंदर्भातील ३० प्रस्ताव महापालिकेच्या नाव समितीकडे आले आहेत. यापैकी जवळपास सर्व प्रस्ताव आजी-माजी नगरसेवक आणि आमदारांकडून सादर करण्यात आले आहेत. नाव समितीने अंतिम मंजुरी दिल्यानंतर हे प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेपुढे ठेवण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकासकामे राबविली जातात. त्याअंतर्गत बांधण्यात आलेले रस्ते, चौक, उड्डाणपूल, भाजीमंडई, उद्याने, अग्निशामक केंद्र, मैदाने, बसस्थानके, पादचारी मार्ग, ध्यानधारणा केंद्र, क्रीडा संकुल, नाट्यगृहे, विरंगुळा केंद्र आदी विकासकामांचे नामकरण करण्यासाठी महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक आणि आमदारांकडून पालिकेच्या नाव समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी काही विकासकामे पूर्ण झाली आहेत, तर काही विकासकामांची उभारणी सुरू आहे.

मात्र, त्यापूर्वीच बांधण्यात येत असलेल्या विकासकामांना नावांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये वानवडीत बांधण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी, वारज्यातील विरंगुळा केंद्राला पावशा गणपती विरंगुळा केंद्र, वडगाव शेरीतील प्ले ग्राऊंडला पंडित दिनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, गोंधळेनगर स्मशानभूमीला शहीद जवान सौरभ फराटे स्मशानभूमी, हडपसरमधील उद्यानास छत्रपती शाहू महाराज उद्यान, लुल्लानगर येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल अशा नावांचा प्रस्ताव आहेआज होणार्‍या नाव समितीच्या सभेत या प्रस्तावांवर विचार केला जाणार आहे.