ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मार्ट सिटी योजना, बाणेर-बालेवाडीच्या हद्दवाढीबाबत आज निर्णय

पुणे, दि. २ - पुणे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बाणेर-बालेवाडी भागात राबविण्यात येणा-या ३४ प्रकल्पांना जागाच नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीत अडचण येत आहे. त्यामुळे या योजनेसाठी दीडपट अधिक क्षेत्र विस्तारून त्याच्या हद्दवाढीचा प्रस्ताव पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसडीसीएल) कंपनीने संचालक मंडळाच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. यावर आज (शनिवार) बैठक होणार असून हद्दवाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सोबतच यावेळी कंपनीच्या दीड वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून या योजनेसाठी सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या मॅकेंझी कंपनीच्या कामाचा प्रगती अहवालही सादर केला जाणार आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बाणेर-बालेवाडीसाठी तब्बल २१०० कोटींचे ३४ प्रकल्प केले राबविण्यात येणार होते. मात्र, या प्रकल्पांसाठी जागाच नसल्याने स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करणे अडचणीचे आहे, असे सांगत कंपनीने या योजनेसाठीच्या क्षेत्राची वाढ तीन चौरस किलोमीटर वरून दीड पट वाढवून ती 8 चौरस मीटर करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठीचे सादरीकरण यावेळी केले जाणार आहे.

यासोबतच वादग्रस्त ठरलेला अॅडप्टीव्ह ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टमचा प्रस्तावही या बैठकीत पुन्हा ठेवला जाणार आहे. त्यासाठी ३२५ कोटींच्या खर्चाची तयारी दर्शविणाऱ्या एल ऍन्ड टी कंपनीने हे काम २९५ कोटींमध्ये करण्याची तयारी दर्शविली असून त्याचे पत्रही कंपनीकडून या बैठकीत सादर केले जाणार आहे. या बरोबरच कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य लुईस मिरांडा यांनी राजीनामा दिलेला असून हा राजीनामाही या बैठकीत ठेवला जाणार आहे.