ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दगडूशेठ गणपतीच्या मंडपाचं काम करताना मजुराचा अपघात

पुणे, दि. ४ - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ब्रम्हणस्पती मंदीराच्या देखाव्याचे शिखर काढताना एक कामगार अचानक कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. राम जाधव (वय22) असं या कामगाराचं नाव आहे. त्याच्या मणक्याला मार लागला असून त्याच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विसर्जन मिरवणुकीला अधिक उंचीच्या देखाव्यामुळे अडथळा येऊ नये, म्हणून मंडळातर्फे देखाव्याचे शिखर काढण्यात येत होते. परंतु अचानक क्रेनवर असणारे राम जाधव हे कोसळल्याची घटना घडली. ही सर्व घटना कॅमेरॅत कैद झाली आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली. याबाबत दगडूशेठ मंडळासोबत पत्रकांरानी संपर्क साधला असता विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी जाधव याला कोणतीही मोठी दुखापत झाली नसून केवळ हाताला खरचटले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त यंदा दगडूशेठ गणपतीसाठी ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. विसर्जनापूर्वी हा देखावा लोकांना पाहता यावा यासाठी त्याचा काही भाग काढण्याचं काम सुरु होतं. यावेळी क्रेनच्या साहाय्यानं हा मजूर देखाव्याचा कळस हलवत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.