ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने सत्कार नाकारला

पुुणे, दि. ६ - सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण; यावरून सुरु झालेला वाद अजूनही शमलेला नाही. याचा वादातून विसर्जन मिरवणूक सोहळ्यात पुणे महापालिकेकडून होणारा सत्कार स्वीकारता मानाच्या भाऊसाहेब रंगारी मंडळाने श्रीचे विसर्जन केले.

प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची रात्री उशिरा सुरु झालेली मिरवणूक सकाळपर्यंत सुरू होती. पुण्यातील रस्त्यांवर बाप्पाच्या स्वागतासाठी सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आज सकाळी मोठ्या थाटात दगडूशेटचे विसर्जन करण्यात आले. पुण्याचे ग्रामदैवत अर्थात पहिला मानाचा कसबा गणपतीचे काल वाजता विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर इतर चारही मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला.

मात्र या मिरवणुकीत महानगरपालिकेचा सत्कार स्वीकारता भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली की लोकमान्य टिळकांनी; यावरून वाद सुरू आहे. यामुळेच रंगारी मंडळाने महानगरपालिकेचा सत्कार स्वीकारता गणपतीचे विसर्जन केले.