ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मिरवणूक मार्गाची साफसफाई, नादब्रम्ह पथकाने घालून दिला आदर्श

पुणे, दि. ६ - गणेश विसर्जन मिरवणूक म्हटले की त्यात अनेक गोष्टींची रेलचेल असते. त्यात खवय्ये प्रेमी तसेच इतर अनेक छोट्या-छोट्या वस्तू विकल्या जातात. त्यामुळे बाप्पा जाता जाता देखील प्रत्येकाच्या पदरात काही ना काही दान टाकून जातात. मात्र, बाप्पांना निरोप देताना आपण धरणीमायची काय दुर्दशा करतो याकडे कोणीही लक्ष देत नाही. याच गोष्टीकडे नादब्रह्म ढोल ताशा पथकाने लक्ष वेधून एक वेगळाच आदर्श घालून दिला.

ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, भाविकांचा उत्साह यामध्ये खाण्यापिण्याची तसेच इतर अनेक वस्तूंची रेलचेल, गुलालाची तर कुठे फुलांची उधळण या सर्वांमुळे आनंद द्विगुणीत होतो. मात्र, हा आनंद साजरा करताना विसर्जन मिरवणुक मार्गाची मिरवणुकीनंतरची अवस्था अतिशय वाईट असते. पडदे, फुलांनी इतर आकर्षक गोष्टींनी सजवलेला मिरवणूक  मार्ग मिरवणुकीनंतर केवळ इतस्तः विखुरलेल्या कच-याच्या साम्राज्याने वेढलेला असतो. मुळात भाविकांसाठी प्रशानाने अनेक सुविधा केल्या असूनही त्यांचा फारसा उपयोग होत नाही. 

मिरवणुकीच्या पाठोपाठ विसर्जन मिरवणूक मार्गाची साफसफाई करून नादब्रम्ह ढोल ताशा पथकाने एक नवीन आदर्श घालून दिला. स्वच्छता अभियानात योगदान दिल्याबद्दल लक्ष्मी रोडवरील मिरवणूक मार्गाची स्वछता करणाऱ्या नादब्रह्म ढोल ताशा पथकाचा पुणे महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.