ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक चालली २८ तास ५ मिनिटे

पुणे, दि. ६ - राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातश्रींच्या विसर्जनाचा सोहळा मंगळवारी मोठ्या दिमाखात पार पडला. पुण्याच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या ढोलताशांच्या गजरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकांनी शहरातील रस्ते नेहमीप्रमाणे गजबजून गेले होते. तब्बल २८ तास पाच मिनिटे चाललेल्या या मिरवणुकीत अनेक कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळाली. तर डॉल्बीवर तरुणाईने धरलेला ठेका बुधवारी दुपारपर्यंत त्याच उत्साहात होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणूक २५ मिनिटे लवकर संपली आहे. या मिरवणुकीत एकूण ३०८७ गणेश मंडळे सहभागी झाली होती.
यंदा पुण्यात गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली होती.  पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मानाच्या पाचही गणपतींची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीला ठीक वाजता सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकांचे शिस्तबद्ध वंदन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणूक पाहण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर गर्दीचा महापूर उसळला होता.
पारंपरिक ढोलताशांच्या कडकडाटांबरोबरच डीजेचाही दणदणाट पाहायला मिळाला. विविध प्रकारचे देखावे, विद्युत रोषणाई केलेले, फुलांची आकर्षक सजावट केलेले रथ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. परदेशी पर्यटक देखील या मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आतुर झालेले होते. सतोमी हिसानो ही जपानी तरुणी गळ्यात ठुशी, नऊवारी साडी असा मराठमोळा साज घालून तांबडी जोगेश्वरी मंडळात सहभागी झाली होती.
ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने मानाच्या पहिल्या असलेल्या कसबा गणपतीचे संध्याकाळी चार वाजून एक मिनिटांनी नटेश्वर घाट येथे