ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गणेशोत्सव संपला पण मांडव अजूनही रस्त्यावरच

पुणे, दि. ७ - गणेश विसर्जन मिरवणूक सलग अठ्ठावीस तासानंतर गुरुवारी दुपारी संपली. मात्र आता मिरवणूक संपल्यानंतर मंडप, देखावे, सजावटीचे साहित्य आणि ट्रॅक्टरवर केलेली सजावट तातडीने काढण्याची आवश्यकता असताना  पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील शेकडो मंडळांनी ही कामे करण्याची तसदी अद्यापही घेतलेली नाही. परिणामी त्याचा त्रास स्थानिक रहिवासी पादचारी आणि वाहनचालकांना होत आहे.

गणेशउत्सवाच्या  १५ ते २० दिवस आधी पासूनच मंडळांकडून मंडप उभारणीस सुरवात केली जाते. त्यामुळे मोठया प्रमाणात रस्ते अडवले जाऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो. पादचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात समस्यांना तोड द्यावे लागते. गणेशोत्सव असल्यामुळे पुणेकर नागरिक या गैरसोयींकडे दुर्लक्ष करतात. पण विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर तातडीने सजावट साहित्य आणि मंडप उतरविण्याचे काम करणे अपेक्षित असते.

परंतु अद्याप पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील अनेक मंडळांनी मंडप काढण्याचे काम सुरु केलेले नाही किंवा ते संथगतीने सुरू आहे. शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेले मंडप अर्धवट काढलेले आहेत. अनेक ठिकाणी मंडपांचे पत्रे, बांबू, वासे रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर सजावटीच्या सामानाने रस्ता व्यापून गेला आहे

मंडळांना मंडप किंवा सजावट काढण्यासाठी काही निश्चित नियमावली करून देण्यात आलेली असली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मंडळांना कोण जाब विचारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता येथील मंडळे विसर्जनाच्या आदल्या दिवशी मंडप उतरवतात. मात्र, विसर्जन मार्गाच्या जवळ गल्ली बोळांमध्ये वा छोटय़ा रस्त्यांवर असलेल्या गणेश मंडळांनी मंडप किंवा सजावटीचे साहित्य