ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे मनपाचा सन्मान भाऊसाहेब रंगारी मंडळाने नाकारला

पुणे, दि. ८ - गणेश विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक अलका चौकात आली तेव्हा पुणे मनपामहापालिकेच्या वतीने देण्यात येणारा सन्मान भाऊसाहेब रंगारी मंडळाने स्वीकारला नाही. मात्र यामागे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक; हा वाद नसून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा आडमुठेपणा आहे.

वास्तविक परंपरे प्रमाणे दरवर्षी महापौर गणपतीचा रथ अलका चौकात आल्यावर नारळ घेऊन मंडळाच्या रथावर जाऊन नारळ देऊन आरती करतात. परंतु महापौर मुक्ता टिळक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरतीला येण्यास सांगूनही स्वागत कक्षासमोर ते मिनिटे थांबूनसुद्धा महापौर स्थायी समिती अध्यक्ष आरतीसाठी आल्याने मंडळाने सत्कार स्वीकारता पुढचा मार्ग पकडला.

शेवटी श्रीगणरायापेक्षा महापौर स्थायी समिती अध्यक्ष मोठे नाहीत; अशी संतप्त प्रतिक्रिया श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.