ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शस्त्र संग्रहालयात पाहता येणार ऐतिहासिक पिस्तुल

सीमा सुरक्षा दलाकडून क्रांतीकारक भगतसिंग यांचे पिस्तुल प्रदर्शनासाठी ठेवण्याची तयारी सुरु असल्यामुळे ज्या पिस्तुलाने १९२८ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्स यांचा स्वातंत्र्यसेनानी भगतसिंह यांनी खून केला, सर्वसामान्यांना ते पिस्तुल पाहता येणार आहे. भगतसिंग यांचे पिस्तुल सीमा सुरक्षा दलाकडून नव्या शस्त्रास्त्र संग्रहालयात ठेवले जाणार आहे. सध्या इंदूरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्समध्ये भगतसिंग यांचे ३२ बोर कोल्ट पिस्तुल ठेवण्यात आले आहे.
भगतसिंग यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सचा खून करताना वापरलेले पिस्तुल सध्या सीएसडब्ल्यूटीच्या जुन्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या पिस्तुलाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळेच भगतसिंग यांनी वापरलेले हे पिस्तुल नव्या संग्रहालयात ठेवण्यात येईल. येत्या दोन महिन्यांमध्ये नव्या शस्त्र संग्रहालयाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकज गूमर यांनी दिली आहे. भगतसिंग यांच्या पिस्तुलासोबत त्यांच्या जीवनाची माहितीदेखील नव्या संग्रहालयात देण्यात येईल.
७ ऑक्टोबर १९६९ रोजी सीएसडब्ल्यूटीमध्ये भगतसिंग यांचे पिस्तुल आणण्यात आले. या पिस्तुलासहित सात इतर शस्त्रेदेखील सीएसडब्ल्यूटीमध्ये आणण्यात आली. पंजाबमधील फिल्लोर येथील पोलीस अकादमीतून भगतसिंग यांचे पिस्तुल सीएसडब्ल्यूटीमध्ये आणण्यात आले होते. हे पिस्तुल ब्रिटिश काळात लाहोरमधून पोलीस अकादमीत आणले असावे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकज गूमर यांनी दिली आहे.
या ऐतिहासिक पिस्तुलाबद्दची माहिती भगतसिंग आणि त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करणाऱ्या गटाला देण्यात आली आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार संग्रहालयात ठेवण्यात आलेले पिस्तुल भगतसिंग यांचेच असल्याचे आणि ते त्यांच्याजवळ असतानाच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे. यासोबतच याच पिस्तुलाच्या मदतीने भगतसिंग यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सचा अचूक वेध घेतला होता, अशी माहितीही पंकज गूमर यांनी दिली आहे.
१७ डिसेंबर १९२८ रोजी सँडर्सला भगतसिंग यांनी लाहोरमध्ये टिपले होते. या घटनेचा उल्लेख लाहोर कट असा केला जातो. भगतसिंग यांना त्यांचे सहकारी राजगुरु आणि सुखदेव यांच्यासह २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली.