ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रेल्वेतील जेवणाचे अवाजवी दर

प्रदीर्घ काळचा प्रवास करणारे वरच्या वर्गातले प्रवासी रेल्वेमध्ये जेवण करतात. त्याशिवाय काही पर्यायही नसतो. जेवण झाले की एक विशिष्ट कर्मचारी जेवणाचे बिल गोळा करतो आणि हे प्रवासी तो सांगेल तेवढे पैसे निमूटपणे देतात. आजपर्यंत तरी कोणी आपण देत असलेले हे पैसे योग्य आहेत की नाही याचा विचारही केला नसेल. परंतु गेल्या आठवड्यात एका जागरूक प्रवाशाची या संबंधातील पोस्ट व्हायरल झाली. आपण ज्या जेवणाला १५० रुपये देतो त्या जेवणाची खरी किंमत केवळ ५० रुपये आहे हे कित्येक प्रवाशांना माहीत नव्हते. त्यामुळे सरसकट प्रत्येक जेवणामागे १०० रुपये अवाजवी घेतले जात होते. प्रवास करणारा माणूस खिशात पैसे घेऊनच प्रवास करत असतो आणि रेल्वेच्या बाहेर कोणत्याही बर्‍यापैकी हॉटेलात जेवण केल्यास साधारणतः १२५ ते १५० रुपये लागतातच.
त्यामुळे आपल्याकडून १५० रुपये घेतले जातात हे अवाजवी आहेत याचा कोणी विचार केला नव्हता. ही पोस्ट व्हायरल झाल्यापासून मात्र लोक जागरूक झाले आणि त्यांनी तक्रारी करायला सुरूवात केली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता अधिकृत दर जाहीर केले आहेत आणि शाकाहारी जेवण ५० रुपयाला तसेच मांसाहारी जेवण ५५ रुपयाला असल्याचा खुलासा केला आहे. चहा प्यायल्यानंतर प्रत्येकजण सहजच खिशातून दहा रुपये काढून देतो. पण चहाची किंमत ७ रुपये आहे असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढे लोक जागरूकपणे वागतील आणि केटरिंग सेवा देणार्‍या कर्मचार्‍याला जेवण झाल्यानंतर ५० रुपये देऊन बोळवतील. परंतु आजपर्यंत अशा प्रकारे १०० रुपये जास्त घेऊन किती रुपयांचा काळा बाजार केला गेला याचा अंदाज घेतला तर रेल्वेचे प्रवासी आजवर करोडो रुपयांना लुटले गेले आहेत असे लक्षात येईल.
चहाचा दर ७ रुपये, पाण्याची बाटली १५ रुपये, उपहार ३० रुपये, मांसाहारी उपहार ३५ रुपये, शाकाहारी जेवण ५० रुपये आणि मांसाहारी जेवण ५५ रुपये असे दर आहेत. याची जाणीव आता लोकांनी ठेवण्याची गरज आहे. ३० रुपयांच्या न्याहरीमध्ये काय काय असावे? जेवणात कोणकोणते पदार्थ असावेेत आणि ते किती असावेत याचे सर्व तपशील रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहेत. रेल्वेने हा खुलासा करताना लोकांना एक आवाहन केले आहे, की यापेक्षा अधिक पैसे मागण्याचा अट्टाहास केल्यास त्याच्याविरुध्द प्रवासी रेल्वे प्रशासनाविरुध्द तक्रार करू शकतात.