ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कवट्या आणि उंदिर घेऊन शेतकऱ्यांची निदर्शने

दुष्काळ आणि कर्जाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक नवीनच मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी मानवी कवट्या व उंदरांना सोबत घेऊन लोकांचे लक्ष आकर्षित केले आहे.
या शेतकऱ्यांनी तोंडात उंदिर घेतले असून त्यांच्या समोर कवट्या ठेवलेल्या आहेत. दुष्काळ आणि कर्जाने बेजार होऊन ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे प्रतीक म्हणून या कवट्या ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी १०० पेक्षा जास्त शेतकरी निदर्शने करत ठिय्या देऊन आहेत. भूकबळी पडू द्यायचा नसेल, तर आम्हाला उंदिर खाण्यावाचून पर्याय नाही, असे हे शेतकरी सांगत होते.
हे शेतकरी तमिळनाडूतील आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे त्यांचे पीक वाया गेले. त्यामुळे त्यांना बँका व सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले, अशी कैफीयत त्यांनी मांडली.
साउथ इंडियन रिव्हर्स लिकिंग फार्मर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष पी. अयाकन्नू यांनी सांगितले की, कर्ज न फेडता आल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या या कवट्या आहेत. दबाव आणि कर्ज न फेडता आल्यामुळे स्वतःचे प्राण घेण्यास शेतकरी असहाय झाले आहेत. अशा काळात आपण जगत आहोत. पंतप्रधानही याकडे कमी लक्ष देत आहेत. त्यामुळे आम्ही येथे पंतप्रधानांकडून मदत मागत आहोत.
मात्र कवट्या त्याच शेतकऱ्यांच्या आहेत अथवा अन्य कोणाच्या, याची पुष्टी होऊ शकलेली नाही.