ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे खुले आव्हान

विविध राजकीय पक्षांकडून मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप केला जात असतानाच आता या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी निवडणूक आयोगानेही केली आहे. मतदान यंत्रासंदर्भात आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून याची तारीख लवकरच जाहीर करु अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक आयोग राजकीय पक्षांकडून होणाऱ्या आरोपांवर आता उत्तर देणार आहे. आरोप करणाऱ्यांना निवडणूक आयोग आता खुले आव्हान देणार असून कसे फेरफार मतदान यंत्रात करता येतात हे सिद्ध करा असे आव्हानच निवडणूक आयोग देणार आहे. यासाठी लवकरच एक तारिख ठरवली जाईल.
यापूर्वी निवडणूक आयोगाने अशा स्वरुपाचे खुले आव्हान २००९ मध्येदेखील दिले होते. त्यावेळीही ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे आरोप झाले होते. पण ‘ओपन चॅलेंज’मध्ये एकालाही हे आरोप सिद्ध करता आले नव्हते. आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर आरोप होत असल्याने पुन्हा ओपन चॅलेंज देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. ओपन चॅलेंजमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले जाईल. याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी, संस्था आणि मतदान यंत्रावर शंका उपस्थित करणाऱ्यांना या ओपन चॅलेंजमध्ये सहभाग घेता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत आरोप सुरु आहेत. कोणतेही बटण या मतदान यंत्रात दाबले की मत भाजपलाच जाते असा आरोप आम आदमी पक्ष, बसपाने केला आहे. तर यावरुन काँग्रेसनेही सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
येत्या ९ एप्रिल रोजी मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील अतेर व उमरिया जिल्ह्यातील बांधवगड या विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी मतदान यंत्राची चाचणी शुक्रवारी अतेर येथे घेण्यात आली होती. या चाचणीत, संबंधित यंत्रावर दिलेल्या विविध पक्षांच्या पर्यायातील कुठलेही बटण दाबले तरी त्यातून भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचीच पावती मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे या आरोपांना आणखी धार मिळाली आहे.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगाने आम्हाला ७२ तासांसाठी मतदान यंत्र द्यावे असे आव्हान दिले होते. आम्ही या कालावधीत मतदान यंत्रात बदल करता येतात हे सिद्ध करुन दाखवू, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्येही मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप झाला होता.