ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पत्रकारांना संरक्षण

महाराष्ट्रात पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे. समाजाच्या जागृतीसाठी राज्यातले पत्रकार मोठा संघर्ष करत आलेले आहेत. समाजाच्या हितासाठी पत्रकार एखादी बातमी छापतो तेव्हा त्या परिस्थितीमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यांचे ते हितसंबंध दुखावले जातात आणि असे हितसंबंधी लोक पत्रकारांनी बातम्या छापू नयेत यासाठी दैनिकावर आणि संबंधित पत्रकारावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. याउपरही त्या दैनिकाने किंवा बातमीदाराने दडपणे जुमानली नाहीत तर प्रत्यक्षात त्यांच्यावर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात पत्रकारितेची व्याप्ती चांगलीच वाढलेली आहे आणि गेल्या चार वर्षात त्या पत्रकारांवर येणारे दबाव, दडपणे आणि हल्ले यांचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षात ३३७ पत्रकारांवर काही गुंडांनी हल्ले केले आहेत. तर विविध माध्यम संस्थांच्या कार्यालयावर ५२ ठिकाणी हल्ले झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारांवरील आणि डॉक्टरांवरील हल्ल्यांचे हे प्रमाण चिंताजनक एवढे वाढलेले आहे.

पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात कायदा नव्हता असे नाही. किंबहुना पत्रकार, शिक्षक, सामान्य नागरिक, शेतकरी अशा कोणावरही हल्ला झाला तर त्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या आरोपींना शिक्षा घडवणारा कायदा अस्तित्वात होता. परंतु पत्रकारांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असल्यामुळे पत्रकारांच्या संघटनांनी केवळ पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात वेगळा कायदा असावा आणि त्याच्या तरतुदी वेगळ्या असाव्यात अशी मागणी करायला सुरूवात केली. महाराष्ट्र सरकारने या दृष्टीने काही विचार करायला सुरूवातसुध्दा केली होती. श्री. नारायण राणे यांची एक समिती यानिमित्ताने नेमण्यात आली होती आणि तिने आपला अहवालही सादर केलेला होता. मात्र पृथ्विराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हा कायदा काही होऊ शकला नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना न्याय दिला आहे आणि पत्रकारांवरील हल्ल्याचा प्रतिबंध करणारा एक स्वतंत्र कायदा केला आहे. कोणावरही हल्ला झाला तरी हल्ला करणार्यांना शिक्षा होतेच. मग पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर कोणत्या वेगळ्या तरतुदी केल्या गेल्या याचा विचार झाला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पत्रकारावरील कोणत्याही प्रकारचा हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र