ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानचा आक्रस्ताळेपणा

१९८० च्या दशकापासून पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष झियाउल हक यांनी या कारवायांना प्रारंभ केला. भारताशी समोरासमोर युध्द झाल्यास आपला टिकाव लागणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांनी भारतावर हे छुपे युध्द लादले. भारतातल्या काही लोकांना असे वाटते की भारतानेसुध्दा पाकिस्तानात अशाच कारवाया कराव्यात आणि पाकिस्तानला जशाच तसे उत्तर द्यावे. पाकिस्तानी लष्कराची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा भारतात घातपाती कारवाया घडवते तशा कारवाया भारताच्या रॉ या संघटनेकडून पाकिस्तानात घडवाव्यात आणि पाकिस्तानला त्रस्त करून सोडावे अशी या लोकांची सूचना असते. सकृतदर्शनी ही सूचना योग्य वाटली तरी अशा प्रकारच्या कारवायांमधून शेवटी निष्पन्न काय होणार आहे. यावर विचार केला असता असा निष्कर्ष निघतो की जशाच तशा कारवायांनी उत्तर दिल्यास दोन्ही देशात अशा कारवाया वाढण्याशिवाय अन्य काही निष्पन्न होणार नाही.

दोन्ही देश गरीब आहेत. तेव्हा त्यांनी परस्परांच्या विरुध्द घातपाती कारवाया करण्यापेक्षा परस्परांची गरिबी हटवण्यासाठी एकमेकांन मदत करावी आणि या मदतीची पूर्व अट म्हणून दोन्ही देशांदरम्यान शांततेचे संबंध प्रस्थापित करावेत. पाकिस्तानच्या घातपाती कारवायांना हेच खरे सकारात्मक उत्तर आहे आणि त्यामुळेच भारताच्या कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्यांनी पाकिस्तानात घातपाती कारवाया घडवण्याच्या कल्पनेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. आपल्या देशाने कितीही समझोत्याचे प्रयत्न केले तरी पाकिस्तानचे शेपूट शेवटी वाकडेच राहिलेले आहे. परंतु भारताच्या संयमपूर्ण प्रतिसादाची आंतरराष्ट्रीय समुदायाने नेहमीच वाखाणणी केलेली आहे आणि त्या उलट पाकिस्तान म्हणजे घातपाती कारवाया करणारे दहशतवादी राष्ट्र आहे. ही पाकिस्तानची प्रतिमा जगभरात निर्माण झाली. तशी ती निर्माण करण्यात भारताने खूप प्रयत्न केले. त्यामुळे आता पाकिस्तानची अवस्था फार वाईट झालेली आहे. जगभर दहशतवादी राष्ट्र म्हणून छीथू होत आहे आणि भारतात केलेल्या कारवायांनी भारताचे त्यांना अपेक्षित एवढे नुकसान होत नाही. पाकिस्तानला अपेक्षित आहे की भारतात घातपाती कारवाया केल्या की त्यातून आपोआपच हिंदू-मुस्लीम दंगली पेटतील आणि देशाच्या एकात्मतेला मोठा धक्का बसेल पण