ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कुणीही या, इव्हीएम मशीन टँपर करून दाखवा- निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने सातत्याने ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केले जात असल्याच्या आरोपांना कडक उत्तर देताना कुणीही या आणि आमची मशीन्स टँपर्ड करून दाखवा असे खुले आव्हान दिले आहे. बुधवारी आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्ष, तंत्रज्ञ, ईव्हीएम मशीन उत्पादक, हॅकर्स असे सर्वांना हे आव्हान दिले आहे. यासाठीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील ही तारीख असेल मशीन टँपर करण्यासाठी १० दिवसांची मुदतही दिली जात आहे.

गेल्यावेळी २००९ मध्येही असाच प्रयोग केला गेला होता. त्यावेळी देशाच्या विविध राज्यातून १०० ईव्हीएम मशीन्स विज्ञान भवनात आणली गेली होती. यंदा हा प्रयोग निर्वाचन सदनात म्हणजे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात केला जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपने पाच विधानसभा निवडणुकांत मिळविलेल्या यशाविरोधात मशीन्समध्ये फेरफार केले गेल्याची तक्रार करून तसा अर्ज आयेागाकडे दिला होता त्यावर निवडणूक आयुक्त नसीम झैदी म्हणाले, येत्या दिवसांत आयोगाची तंत्रसमिती या प्रयोगासाठी स्पेसिफिकेशन ठरविणार आहे. त्यात आणण्यात येणारी मशीन उत्तर प्रदेशातीलही असतील. नियमानुसार मतदानानंतर ४० दिवस मशीन्स स्टाँगरूम बाहेर काढता येत नाहीत. या महिन्यात ही मुदत संपते आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात ही मशीन्स टँपर करण्याच्या प्रयत्नासाठी दिली जातील त्यात तज्ञ, सायंटिस्ट, मशीन उत्पादकही सहभागी होऊ शकतील.