ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देशातील काही मंदिरात आहेत दलित पुजारी

आपल्या कित्येकांचा आजही असा समज आहे की, ब्राम्हण हेच मंदिरात पुजारी असतात. पण सुरूवातीपासूनच देशात कर्मावरून वर्णव्यवस्था निर्माण झाली. जे काम ज्याचे होते त्यावरून त्याचा वर्ण ठरत असे. रक्षण करण्याचे कार्य क्षत्रिय समाज करीत असत. व्यापाराचा व्यवसाय वैश्य करीत असत तसेच पूजा करण्याचे काम केवळ ब्राह्मणांनीच करायचे. पण तो काळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. पूर्वी सारख्या लोकांना अमुक एकच व्यवसाय करावा अशी मर्यादा आता नाही. प्रत्येकाला आवडेल ते काम करण्याची मुभा आता आहे. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते. पण देशात अशीही काही मंदिरे आहेत जिथे ब्राह्मण पुजारी नसून दुसऱ्या समाजाचे पुजारी आहेत.

देवावर कोणा एकाचाच अधिकार नाही. देव सगळ्यांचा आहे. म्हणूनच देवाची पूजा करण्याच्या अधिकार प्रत्येक माणसाला आहे, असे म्हणतात. मात्र आजही आपल्या देशात अशा घटना ऐकायला मिळतात की एखाद्या व्यक्तीला देवळात पूजेचा हक्क नाही किंवा देवळात प्रवेश नाही. पूर्वीपासूनच अशी शिकवण आपल्या संतमंडळींनी दिली आहे की माणसाने कुठल्याही प्रकारचा भेदभाव माणसाशी करू नये. प्रत्येकाशी प्रेमाने माणूसकीनेच वागावे. काही लोक आजही हे मानत नाहीत दुसऱ्याला कनिष्ठ समजून वाईट वागणूक देतात. परंतु हळू हळू हे प्रमाण कमी होते आहे. लोक हे स्विकारत आहेत की प्रत्येकाला देवाशी जोडल्या जाण्याचा देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. म्हणूनच भारतात अशीही काही मंदिरे आहेत जिथे पुजारी हे ब्राह्मण समाजाचे नसून दुसऱ्या समाजाचे आहेत.

देवभूमी उत्तराखंड मध्ये एक मंदिर असे आहे जिथे ब्राह्मण किंवा क्षत्रिय पुजारी नसून अनुसूचित जातीचे आहेत. हे देऊळ चार धामांपैकी एक बद्रीनाथ-कर्णप्रयाग पासून फक्त किलोमीटरच्या अंतरावर आहे. ‘कालेश्वर भैरव मंदिरम्हणून हे देऊळ प्रसिद्ध आहे. पण स्थानिक ह्या मंदिरालाकाल्दू भैरव मंदिरअसे म्हणतात. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे बद्रीनाथ धाम येथे जी रोज आरती गायली जाते ती कुणा हिंदू भक्ताने रचलेली नसून प्रयाग येथील बदरुद्दीन ह्यांनी लिहिली आहे. बदरु�