ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सिगरेट कंपनीमुळे आयुर्विमा महामंडळ मालामाल

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात बडी विमा कंपनी आयुर्विमा महामंडळ इंडियन टॉबॅको कंपनी म्हणजेच आयटीसीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून मालामाल झाली आहे. योगक्षेमं वहाम्यहम अशी विमाधारकांच्या जीवनाची कंाळजी घेणारी एलआयसी धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे अशी सूचना द्यावी लागणार्‌या सिगरेट कंपनीमुळे श्रीमंत बनल्याने तो मोठाच चर्चेच विषय बनला आहे.

तंबाखू तंबाखू उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्यास हानी पोहोचते या कारणाने अनेक कंपन्यांनी सिगरेट कंपन्यांमधील गुंतवणूक काढून घेतल्याचा फायदा एलआयसीला झाला आहे. जागतिक स्तरावर अनेक गुंतवणूक कंपन्या, म्युच्यूअ्रल फंड कंपन्या तंबाखू उत्पादन कंपन्यांत गुंतवणूक करण्यापासून दूर राहिल्या आहेत. मात्र एलआयसीचा आयटीसी मधील हिस्सा १६. टक्क्यांवर आहे. पहिल्या तिमाहीत त्यात टक्के वाढ झाली आहे. एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ५५ हजार कोटींवर गेले आहे. शिवाय सार्वजनिक क्षेत्रातील अन्य विमा कंपन्या ओरिएंटल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स कार्परेशन यांचीही यातील भागी १७ हजार कोटींवर गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल केली गेली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी तंबाखू उद्योगात गुंतवणूक करणे हे सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप केला गेला आहे.