ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

व्हीआयपी कल्चरला लाल दिवा

भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही तर आहेच पण ती तब्बल ७५ वर्षे टिकली आहे. शिवाय या लोकशाहीत निरनिराळ्या स्तरावरील निवडणुका नियमाने आणि तुलनेने शांतपणे होत असतात. त्यामुळे आपले जगात कौतुक होत असते. एवढ्या मोठ्या देशात निवडणुका शांततेने कशा होतात याचे नवल वाटणारे काही देश निवडणुका घेण्याचे तंत्र भारतापासून शिकले पाहिजे असे आता म्हणायला लागले आहेत. पण लोकशाही म्हणजे काय केवळ निवडणुकाच असतात का ? मुळात लोकशाहीची संकल्पना लोकांच्या मनात रुजायला नको का? तशी रुजली नसल्याने जगातल्या या सर्वात मोठ्या लोकशाहीत अनेक सरंजामशाही संकेत आहेत तसेच चालू राहिले होते. त्यातला एक संकेत म्हणजे लाल दिव्याच्या गाड्या आणि त्यात फिरणार्या जहागिरदारांच्या ऐटी. काल केन्द्रातल्या मोदी सरकारने ही सरंजामशाहीची निशाणी मिटवली आणि या लोकशाहीत जे लोक लाल दिव्याच्या गाड्या वापरत आहेत त्यांच्या गाड्यांवर यापुढे लाल दिवे नसतील असा निर्णय घेतला.

सर्वसामान्य माणसाला या निर्णयाचा अर्थ लगेच कळेल असे नाही कारण त्याने लोकशाहीचा फार खोलात जाऊन विचार केलेला नसतो. आपण ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देतो ते आपले राजे नसून प्रतिनिधी असतात. ते आपल्यापेक्षा मोठे नसतात तर आपल्याच पातळीचे असतात. हे एकदा लोकांना समजून सांगायला हवे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या आधी देशात राजेशाही होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना असे वाटायला लागले की आता राजे गेले आणि त्यांच्याऐवजी हे निवडून दिलेलेच पण राजे आले आहेत. आपले प्रतिनिधी आणि आपली लोकशाही याचे संकल्पनाच त्यांच्या डोक्यात नव्हती. पूर्वी आपले राजे होते आता तेच राजे निवडून येत आहेत. याच कल्पनेतून लोकांनी या लोकशाहीत तिच्याशी पूर्ण विसंगत असलेली घराणेशाहीही आपण स्वीकारली आहे. आमदाराचा मुलगा आमदार होतो आणि गांधी घराण्याचा कुलदीपक पंतप्रधान होण्यासाठीच जन्माला येत असतो हे आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांनी मान्य केले आहे. अशा या प्रतिनिधींना आपण देशातल्या कायद्यांवर चर्चा करण्यासाठी आपण निवडून दिलेले आहे याची खोलवर जाणीव