ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोठे मासे गळाला

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम् यांच्याशी संबंधित कार्यालये तसेच त्यांची निवासस्थाने यावर धाडी टाकण्यात आल्या असून त्यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अजूनही खुद्द पी. चिदंबरम् हे कशात सापडलेले नाहीत. परंतु या निमित्ताने ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या पाहिल्या असता कार्ती चिदंबरम् यांच्या चुकीच्या अर्थव्यवहारासाठी पी. चिदंबरम् यांच्या अर्थमंत्री पदाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुुळे या सार्या कारवाईपासून पी. चिदंबरम् दूर राहतील अशी शक्यता नाही. ही कारवाई झाल्यानंतर चिदंबरम् यांनी नेहमीप्रमाणेच हे सरकार विरोधकांचा सूड घेत आहे असे आकांडतांडव केलेच

पी. चिदंबरम् सध्या एका इंग्रजी दैनिकात साप्ताहिक स्तंभ चालवत असून त्यातून नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयावर टीकेचे प्रहार करत आहेत. खरे म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात चिदंबरम् यांच्याशिवायही अनेक स्तंभलेखक लिखाण करत आहेत. परंतु त्यातल्या कोणत्याही पत्रकारावर मोदी सरकारने आपल्या विरोधात लिखाण केले म्हणून सुडाची कारवाई केलेली नाही.

पी. चिदंबरम् हे मात्र आपण मोदींच्या विरोधात लिखाण करतो म्हणून आपल्यावर खटले भरले जात आहेत आणि आपल्याला नमवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रत्यारोप करत आहेत. अर्थात, कोणालाही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याबद्दल अटक झाली तर अटक होणारा आरोपी आपल्याला झालेली अटक योग्य आहे असे कधीच म्हणत नाही. आपल्यावर खोटे आरोप लावले आहेत, आपण विरोधात आहेत म्हणून आरोप लावले आहेत, आपण एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून आरोप लावले आहेत असा कांगावा तो करतच असतो. मात्र लोकांनी लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की चिदंबरम् यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. कारण त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आज नव्हे तर - वर्षांपासून चर्चिले गेलेले आहे. एकदा चिदंबरम् हे केंद्रीय गृहमंत्री होते आणि त्याचवेळी आज राष्ट्रपती असलेले प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते. एकेदिवशी प्रणव मुखर्जी आपल्या कार्यालयात आले असताना त्यांना सर्वत्र काही छोटी छोटी उपकरणे लावलेली दिसून आली. या प्रकाराचा त्यांनी छडा लावला. तेव्��