ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्नाटकी कुरापत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळ्या दिनी मराठी बांधवांनी दाखवलेल्या एकजुटीचे पडसाद अजूनही उमटत आहेत. सीमाभागाचा गळा आवळून मराठी भाषकांना कर्नाटकी जोखडात बांधून ठेवण्याच्या मनसुब्याला कधी ना कधी सुरूंग लागणार याची पक्की जाणीव असलेल्या कर्नाटकच्या राज्यकर्त्यांनीजय महाराष्ट्रचा किती धसका घेतला आहे, हे ताज्या घटनांवरून स्पष्ट होते. कर्नाटकातील महापालिका सदस्य किंवा लोकप्रतिनिधींनीजय महाराष्ट्रचा जयघोष केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा केला जाणार असल्याच्या वल्गना कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दोनच दिवसांपूर्वी बेळगाव दौऱ्यावेळी केल्या. सरकारविरोधात उद्या गुरुवारी मराठी भाषकांकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाची बेळगावात जय्यत तयारी