ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

साताऱ्यातील बोरगाव बुद्रुक... कर्ज फेडणारं गाव

सातारा, दि. ६ - गावची शेती ओलिताखाली आणण्यासाठी काढलेलं कर्ज वेळेत फेडणारं गाव म्हणून साताऱ्यातील बोरगाव बुद्रुक या गावाने ओळख निर्माण केली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना या गावाने एका वेगळ्या प्रकारे आदर्श घालून दिला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील दुर्गम पट्यातील बोरगाव बुद्रुक हे गाव. पावसाळ्याव्यतरिक्त शेतीला पाणी नाही. चांगला पाऊस झाला तर भात शेती होते. अन्यथा आकाशाकडे डोळे लावून बसण्याला पर्याय नाही. अनेक वेळा तर भात शेती केल्यावर पावसाने हुलकावणी दिली की, लावलेली भात शेती जळून जायची.

तीस वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांनी स्वत:च्या बळावर शेती ओलिताखाली आणण्याचं ठरवलं आणि १९८९ साली गावात लोक वर्गणी काढायला सुरुवात केली. पाहता पाहता गावाने सहकारी भू-विकास जलसिंचन संस्था उभी करुन गावात पाणी आण्याचा निर्णय घेतला आणि लोक वर्गणीतून १५ लाख रुपये जमा केले.

यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याने कर्ज काढले. दोन टप्प्यात पाणी उचलून गावात पाणी आणले. नुसते गावातच पाणी आणले नाही तर गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाईपलाईन करुन पाणी नेले आणि गावतली तब्बल २०० एकर जमीन ओलिताखाली आली.

बारा महिने शेतीला पाणी म्हटल्यावर गावातला प्रत्तेक व्यक्ती प्रत्येक पाहिजे ते पीक घेऊ लागला. गाव सुजलाम् सुफलाम् होत गेलं. कर्ज काढून शेती करायला सुरूवात केली आणि आणि प्रत्येक शेतकऱ्याने कर्ज फेडायला सुरुवात केली. सुरुवातीला पाईपलाईनसाठी काढलेलं कर्ज फेडलंच फेडले. पण नंतर शेती करण्यासाठी लागणारं प्रत्येकवर्षी कर्ज काढणं आणि कर्जाचे हप्ते वेळेत फेडत नेले.

पाणी साठवण्यासाठी तयार केलेली पन्नास फुटाची विहीर डिसेंबरमध्ये कोसळली. गावावर पुन्हा संकट कोसळलं. गावानं पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला आणि पुन्हा लोक वर्गणी गोळा केली. ० लाख रुपये गोळा केले आणि धरणातून थेट पाणी गावात आणलं. या प्रकल्पाच उद्घाटन नुकतंच जेस्ट अभिनेते सुरेश पाल आणि सिया पाटिल यांच्या हस्ते झाले. गावच्या एकीमुळे ही पाहुणे मंडळी भारावून गेली.

काही ग्रामस्थांनी तर एकत्र येऊन आपली जमीन फळबागांसाठी राखून ठेवली. त्यासाठी १५ शेतकरी एकत्र आले आणि तब्बल ३० एकराच्या जमिनीत त्यांनी दीड हजार कलमी आंब्यांची झाडे लावली. या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी कंपाऊंड