ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिवसेनेचे संभ्रम पर्व

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठवड्यापासून कर्जमुक्तीच्या मनःस्थितीत यायला लागले आहेत. एवढेच नव्हे तर आपले सरकार जी कर्जमाफी देईल ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी असेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो की काय अशी शंका शिवसेनेच्या मंत्र्यांना आली. ही कर्जमाफी झालीच तर तिचे श्रेय कोणाला मिळणार यावरून आता राजकारण सुरू झालेले दिसत आहे. कर्जमाफी झालीच तर ती शिवसेनेमुळेच झाली असे भासवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. एकंदरीत कर्जमाफीचे श्रेय आपल्यालाच मिळावे अशी त्यांची धडपड आहे. शिवसेनेच्याच संभ्रमाचा हा सारा परिणाम आहे. आपण सत्ताधारी आहोत की विरोधक आहोत याबाबत शिवसेना नेत्यांच्या मनात संभ्रम आहे तोच अशा प्रकारच्या निर्णयातून प्रतित होत असतो.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काल बहिष्कार टाकला. त्यातसुध्दा संभ्रम आहे. कारण शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून आपली छबी निर्माण करायची आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवरील बहिष्कार हे विरोधक असल्याचे लक्षण आहे. म्हणून शिवसेनेचे मंत्री काल या बैठकीला गैरहजर राहिले. परंतु त्याला बहिष्कार म्हणावा की गैरहजेरी म्हणावी यावर आता वाद सुरू झाला आहे. शिवसेनेला सत्ताधारी म्हणावे की विरोधक म्हणावे हा जसा एक वाद आहे. त्याच वादाचा एक पैलू या कथित बहिष्कारातून प्रकट होताना दिसत आहे. म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. शिवसेनेचा हा बहिष्कारच असेल तर त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली कशासाठी हा प्रश् अनुत्तरित असतानाच सेनेचे काही नेते हा बहिष्कारच आहे असे जोर देऊन सांगत आहेत. या सगळ्या प्रकारामागे मतांचे राजकारण आहे आणि त्यासाठी शेतकर्यांचा संप, त्यासाठी कर्जमाफी हे मुद्दे वापरले जात आहेत. महाराष्ट्रात संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे लंडनमध्ये बसलेले आहेत. ते तिथे काय