ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्जमाफीचे आव्हान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले वर्षभर शेतकर्यांना कर्जमाफी करणारच नाही या म्हणण्यावर ठाम राहायचे ठरवले होते. नंतर त्यांनी कर्जमाफी करू पण योग्यवेळी करू असे म्हणायला सुरूवात केली. परंतु भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातल्या अल्पभूधारक शेतकर्यांना कर्जमाफी करून मोठे संकट ओढवून घेतले. कारण शेतकर्यांची कर्जमाफी हे भाजपाचे धोरण असेल तर ते धोरण महाराष्ट्रात का राबवत नाही असा बिनतोड सवाल त्यांना विचारला गेला. त्यावर मात्र त्यांना तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. अर्थात तो केवळ उत्तर प्रदेशासारखा घेऊन भागले नाही. उत्तर प्रदेशात केवळ अल्पभूधारकांनाच आणि केवळ एक लाखापुरतेच कर्ज माफ करण्यात आले होते. महाराष्ट्रात मात्र सरसकट सर्वांना कर्जमाफी जाहीर करावी लागली. या गोष्टीवरून बरेच राजकारणही झाले. फडणवीस काही कर्जमाफी करणार नाहीत असा सर्वांचा कयास होता आणि त्यांनी कर्जमाफी केल्यास हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा प्रचार करण्याची संधी आपल्याला मिळेल असा विरोधकांचा होरा होता.

प्रत्यक्षात मात्र फडणवीस यांनी मोठेच धाडस केले आहे. खरे म्हणजे त्यांनी हा निर्णय घेऊन विरोधकांची बोलती बंद केली आहे. कर्जमाफी करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षांसाठी अधिक धोकादायक ठरले आहेत. मात्र तसे होण्यासाठी फडणवीस यांना फार मोठे आव्हान स्वीकारावे लागलेले आहे. कारण अशा प्रकारे सरसकट सर्वांना कर्जमाफी करून त्यांनी राज्याच्या तिजोरीवर ५० हजार कोटींचा बोजा ओढवून घेतला आहे. राज्य सरकारवर आधीच लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना त्यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी होऊन दोन दिवस झाले नाहीत तोच काही वृत्तपत्रांनी ही कर्जमाफी राज्याची दिवाळे काढणारी कशी आहे हे दाखवून द्यायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत कर्जमाफ होत नव्हते तोपर्यंत सरकारवर कर्जमाफ केल्याबद्दल टीका केली जात होती आता कर्ज माफ केल्याबद्दल टीका सुरू केली आहे. एके दिवशी उठून ५० हजार कोटी रुपयांचा बोजा उचलावा एवढी राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे राज्य सरकारला या ५० हजार कोटी रुपयांची भरपाई करताना नाकीनव येणार आहेत. त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा