ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

समुपदेशनाची गरज

दहावी-बारावी नंतर काय, असा प्रश् प्रत्येकालाच पडलेला असतो. मात्र आपल्या भावी आयुष्याचा हा प्रश् सोडवताना बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक फार उदासीन असतात. आपल्या मुलाने अमुक एक करिअरच करावे, असा बर्याच पालकांचा अट्टाहास असतो. विशेषत: अशिक्षित आणि गरीब पालकांत ही प्रवृत्ती दिसते. फार मोठा पगार देणारी नोकरी मिळवून देईल असे शिक्षण घ्यायचे झाले तर शिक्षणासाठी फार मोठा खर्चही करावा लागतो. तेव्हा तशा शिक्षणाच्या फार भानगडीत पडता आपल्याला जमेल ते शिक्षण घ्यावे असा सरधोपट विचार हे पालक करत असतात. अशा पालकांना खरे म्हणजे समुपदेशनाची फार गरज असते. कारण आपल्या जवळ पैसा नाही याचा अर्थ मुलाचे चांगले करिअर घडूच शकत नाही असा होत नाही. पैसा खर्चताही चांगले करिअर घडवता येते. मात्र, त्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन करणार्या संस्था किंवा व्यक्तींकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.

एका बाजूला ही उदासीन प्रवृत्ती आहे तर दुसर्या बाजूला आपल्या मुलांच्या करिअरच्या बाबतीत फाजील दक्ष असलेले लोक आहेत. आपल्या मुलाने इंजिनिअर किंवा डॉक्टर झालेच पाहिजे असा अट्टाहास या वर्गातले पालक करत असतात. डॉक्टर किंवा इंजिनिअर यांना मिळणारा मानमरातब आणि पैसा यातूनच हा अट्टाहास निर्माण झालेला असतो. मात्र मुलांची अभ्यासातली झेप आणि विशिष्ट गुण मिळविण्याची कुवत, त्याचबरोबर त्यांची आवड-निवड याचा कसलाही विचार करता हे पालक या मुलांवर ही महत्वाकांक्षा लादत असतात. अशी मुले पालकांच्या महत्वाकांक्षांचे ओझे वाहून, दमून, थकून वाकून जातात. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलांचा विचार घेतला पाहिजे, त्याची आवड-निवड समजून घेतली पाहिजे आणि त्याच्या मनात असेल तोच अभ्यासक्रम त्याला दिला पाहिजे हा विचार समोर आला आहे आणि काही पालक तसे करतही आहेत.

पालकांनी सर्वस्वी आपल्या कलाने मुलाच्या भवितव्याचा निर्णय घेऊ नये हे तर खरे आहेच. पण मुलांत सुद्धा आपल्या भवितव्याचा निर्णय घेण्याची कुवत असतेच असे नाही. आवडी ही गोष्ट वेगळी आहे आणि व्यवसायाची निवड केवळ आवडीच्या आधारावर करता येत नसते हे लक्षात घेतले पाहिजे. काही वेळा