ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कारागृहातील अत्याचार

भायखळ्याच्या कारागृहामध्ये शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने दंगल केली म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तुरुंगामध्ये २०० महिला कैदी आहेत. त्या सर्व महिलांनी तुरुंगात गोंधळ घातला आणि तुरुंगाच्या गच्चीवर जाऊन घोषणा दिल्या. काही वृत्तपत्रांची होळी केली. या संबंधात इंद्राणी मुखर्जीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीना बोरा हत्या प्रकरण बरेच गाजले असल्यामुळे आणि इंद्राणी मुखर्जी ही सेलिब्रिटी असल्यामुळे या बातमीला माध्यमामध्ये मोठी प्रसिध्दी मिळाली. परंतु या निमित्ताने अधिक सखोल चौकशी केली असता मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला. इंद्राणी मुखर्जी हिने उगाच दंगल केलेली नाही. त्या दंगलीमागे त्या कारागृहातल्या अत्याचारांना वाचा फोडण्याचा हेतू होता.

याच कारागृहामध्ये खुनाच्या एका प्रकरणातील आरोपी असलेली मंजुळा शेटिया ही शिक्षा भोगत होती. तुरुंगातल्या सहा महिला अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी मंजुळाला मरेपर्यंत मारले आणि त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या २०० कैद्यांनी आपला असंतोष प्रकट केला. या निमित्ताने या अत्याचारावर प्रकाश पडला. मंजुळा शेटिया मेलीच कशी असा प्रश् उपस्थित झाला आणि या संबंधात इंद्राणी मुखर्जी हिला न्यायालयात उभे करण्यात आले तेव्हा तिने आपला जबाब नोंदताना मोठा बॉम्बस्फोटच केला. मंजुळा शेटिया ही मरण पावल्यानंतर तिची शवचिकित्सा करण्यात आली. तिच्या अहवालामध्ये तिच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या मुक्या जखमा होत्या असे म्हटले आहे. त्यामुळे तिचा मृत्यू मारहाणीत झाला असे सर्वजण समजून चुकले होते.

इंद्राणी मुखर्जीने मात्र या मारहाणीचे सविस्तर वर्णन केले. ते अंगावर शहारे आणणारे होते. मंजुळाचे डोके अनेकवेळा भिंतीवर आपटण्यात आले होते. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. लोखंडी कांब, बांबू, काठी अशा ज्या काही वस्तू हाती लागतील त्यांचा वापर करून सहा महिला कॉन्स्टेबल तिच्यावर तुटून पडलेल्या होत्या. तिच्या गुप्तांगावर जखमा झालेल्या होत्या. एवढेच नव्हेतर गुप्तांगामध्ये लोखंडी कांब आणि काठी खुपसण्यात आली होती. मारहाणीने ती बेशुध्द होऊन पडत असे. तेव्हा तिच्या तोंडावर पाणी मारून तिला सावध केले जाई आणि पुन्हा मारहाण केली जात असे. अशा प्रकारची मारहाण झाली असेल तर या संबंधातल्या