ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लातूरचे आणखी एक रॅकेट

लातूर या शहराचे नाव काही ना काही निमित्ताने बातम्यांत येत आहे. गेला उन्हाळाभर लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. असा प्रकार पहिल्यांदाच होत असल्याने त्याची खूप चर्चा झाली. गेल्या महिन्यांत लातूरमध्ये परदेशातल्या काही लोकांशी संपर्क साधून देणारे छुपे आणि खाजगी टेलिफोन एक्स्चेंज उघड झाले. त्याचे संबंध देशातल्या काही अशाच केन्द्रांशी असल्याचे दिसून आले असून यामागे काही अतिरेक्यांचा हात होता काय याचाही तपास केला जात आहे. ही प्रकरणे गाजत असतानाच काल लातूर येथे मुलींची तस्करी करणारी टोळी उघड झाली आहे. वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली अविवाहित मुलींची नावे नोेंदून घेणे आणि त्यांचे विवाह लांबच्या लोकांशी लावून देऊन त्यातून पैसे कमावण्याचा हा धंदा आहे.

या रॅकेटची सूत्रधार ही कॉंग्रेसची कार्यकर्ती आहे आणि एका मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून तिच्यासह दहा जणांना अटक करण्यात आले आहे. देशाच्या काही भागात गरिबांच्या मुलींना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेश्या वस्तीत नेऊन विकण्याचे प्रकार ठावूक झाले आहेत पण लातूरचा हा प्रकार तसा नसावा असे दिसत आहे. या रॅकेटमागे लोकसंख्येतला मुला-मुलींच्या संख्येचा असमतोल हे कारण आहे. कारण लोकसंख्येतले मुलींचे प्रमाण एवढे कमी झाले आहे की काही जातींत लग्नाला मुली मिळणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लग्नात मध्यस्थी करणार्या वधू वर सूचक मंडळांकडून मुलींची नावे आणि पत्ते मिळावीत यासाठी त्यांना मोठ्या रकमांचे आमिष दाखवले जात आहे.

यातल्या काही मंडळांनी वर पित्यांची गरज ओळखून आणखी पाऊल पुढे टाकले आहे. मुलगी मिळवून दिल्यास वधू वर सूचक मंडळाची ठरलेली फी देण्यापलीकडे जाऊन काही रक्कम देण्यास वरांचे पालक सरसावले आहेत. मात्र त्यासाठी मंडळांच्या चालकांना मुलीला लग्नास राजी करण्याचाही प्रयास करावा लागतो. तो केल्यास आणि कसेही करून लग्न जमवून